हवामान बदलाचे संकट या विषयावर पुणे येथे चर्चासत्र संपन्न

13

 

 

पुणे प्रतिनिधी

हवामान बदलाचे संकट या विषयावर पुणे येथे चर्चासत्र संपन्न

 

हवामान बदलाचे संकट (क्लायमेट क्रायसिस) : स्वरूप, आव्हाने, मुकाबला करण्याचे मार्ग आणि कृती कार्यक्रम या विषयावर जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या वतीने काल पुण्यात दिवसभराचे चर्चासत्र झाले. या विषयावर काम करणारे अभ्यासक आणि कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले. ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ माधव गाडगीळ, विजय परांजपे, प्रफुल्ल सामंतरा, सौम्या दत्ता यांचे मार्गदर्शन मिळाले. इंदवी तुळपुळे, सारंग यादवाडकर, गुरुदास नुलकर, सीमा अग्रवाल, इरा देऊळगावकर, रवींद्र सिन्हा, रितू परचुरे, रणजीत गाडगीळ असे अभ्यासक प्रत्यक्ष तर मेधाताई पाटकर, अतुल देऊळगावकर, परिणीता दांडेकर, डॉ सतीश गोगुलवार हे अभ्यासक कार्यकर्ते व्हिडिओच्या माध्यमातून सहभागी झाले.
कोकणच्या रिफायनरीपासून तर मुंबईच्या गरीब श्रमिकांपर्यंत, लवासा पासून तर चंद्रपूरच्या जंगलापर्यंत आणि नर्मदेच्या खोऱ्यापर्यंत पर्यावरणाच्या प्रश्नावर लढणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींनी आपल्या कार्याची माहिती दिली. हे सगळे तरुण कार्यकर्ते होते हे विशेष!
पर्यावरणाच्या क्षेत्रात कार्य करणारे संपतराव पवार, कल्पनाताई साळुंखे, सुबोध वागळे, आशिष वेले तसेच साधनाताई दधीच, वर्षा गुप्ते, चैत्रा रेडकर यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
सुहास कोल्हेकर, संतोष ललवाणी, सुजय मोरे, अमित राज, अजिंक्य गायकवाड, सीरत सातपुते, युवराज गटकळ, प्रसाद बागवे, इब्राहिम खान, शिवा, इला दलवाई, विनय र .र. अशा अनेक कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
रमाकांत धनोकर या चित्रकार मित्राने केलेले पार्श्वभूमीवरील चित्र आणि पोस्टर्स अर्थपूर्ण होती. एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या राहुल भोसले यांचेही सहकार्य मिळाले.
या विषयावर कार्य पुढे देण्यासाठी ‘ सामाजिक आणि पर्यावरणीय न्यायासाठी जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वया’ च्या महाराष्ट्राच्या विभागाची घोषणा करण्यात आली.