गंधारधून प्रस्तुत स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त पुण्यातील विशेष कार्यक्रमाला पुणेकर रसिकांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणेकर रसिक श्रोत्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया —
पुणे :-
सावरकरांची राष्ट्राबद्दलची भक्ति.. ओढ.. त्यांनी त्यांच्या काव्यामध्येही निर्माण केली होती. सावरकरांच्या काव्य प्रतिभेला शब्दात बांधणं हे महाकाठीण काम, शिवाजी महाराजांविषयीचे प्रेम, भारतभूमीवरील प्रेम त्यांनी त्यांच्या काव्याद्वारे व्यक्त केले. ‘हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा’ ते अगदी ‘सागरा प्राण तळमळला पर्यन्त’…. त्यांच्या कविता, फटके, आरती, पोवाडे यांचे आम्हाला कळलेले निरूपण आम्ही आमच्या परीने सादर करायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय’ हे गंधारधूनच्या सादरकर्त्या पल्लवीचे प्रांजळ मत त्यांनी सुरवातीलाच व्यक्त केलं. आणि मी हे सांगतो की त्यांनी प्रयत्न केला. तो मायबाप रसिकांना खूप आवडला… श्रुतीच्या गळ्यात सरस्वती नांदतेच हे तिने कुठल्याही वाद्यांशिवाय सादर केलेल्या जयोस्तुते, सागरा प्राण तळमळला , हे हिंदू नृसिंहा प्रभो ह्या गाण्यांच्या सादरीकरणातून लगेच लक्षात येते. सागरा प्राण तळमळला या गीताला वन्स मोअर ही मिळाला आणि सावरकरांवर गाढी श्रद्धा असणाऱ्या एका रसिकाने तिला स्टॅंडिंग ओव्हिएशन सुद्धा दिलं … पल्लवीच निवेदन नेहेमीप्रमाणेच रसिकांना भावले. बाजीप्रभूंच्या पोवड्याचे सादरीकरण इतकं छान झालं की प्रत्यक्ष पावनखिंडीचा प्रसंग रसिकांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. कवितांचे सादरीकरण आणि निवेदनाला टाळ्यांचा कडकडाट होत होता. सावरकरांनी जी लावणी लिहिली आहे त्याचे सादरीकरण ह्या दोन्ही सादरकर्त्यांनी भन्नाट केले. पुण्याच्या रसिकांची दाद इतकी छान होती की एका वृद्ध आजोबांनी पल्लवीला बक्षीस म्हणून व आशीर्वाद म्हणून रोख रक्कम सुद्धा दिली… एका वृद्ध आजींनी या दोघींनाही आवर्जून सांगितलं की त्यांना खूप कौतुक वाटलं ह्या कार्यक्रमाच्या संकल्पनेचं आणि त्यांच्या डोळ्यांत पाणी ही दाटून येत होतं…. सावरकरांच्या व्यक्तिमत्वाच ‘कवी’ हे वैशिष्ट्य त्यांनी फार बारकाव्यांनीशी रसिकांसमोर आणले.. ही गंधारधून संस्था वेगवेगळ्या संकल्पनेवर कार्यक्रम सादर करीत असते. श्रुती आणि पल्लवीची मेहनत ठायी ठायी दिसून येते.. त्यांना संधी द्यावी अशी मी विनंती सर्व रसिक श्रोत्यांना करतो. आणि हो जरी नेपथ्य नसेल, प्रकाशयोजना नसेल तरी त्यांचा कार्यक्रम त्यांच्या गाण्याच्या आणि निवेदनाच्या जोरावर त्या दोघीही यशस्वी करू शकतात हे ही त्यांनी दाखवून दिलंय