- देवगड : मालवण येथे होत असलेल्या भारतीय नौदल दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान तसेच इतर अति महनिय व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तारीख २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर पर्यंत मालवण येथील जलक्रीडा, किल्ला वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे ! तरी सद्याचा पर्यटन हंगाम लक्षात घेता ! सिंधुदुर्ग मध्ये येणारे पर्यटक देवगड तालुका येथे खुप जास्त प्रमाणात येण्याची शक्यता आहे ! यामुळे देवगड तालुक्यामधील पर्यटनाशी संबधित असलेल्या सर्व व्यावसायिक यांनी येणाऱ्या पर्यटक यांची गैरसोय होऊ नये .
या दृष्टीने सज्ज राहावे,असे आवाहन देवगड तालुका व्यापारी संघ ,देवगड तालुका व्यापारी पर्यटन विकास समिती ,यांच्या मार्फत करण्यात आले आहे .




