पेंडूर सातवायंगणी येथे आदर्श शिक्षिका प्रा. सुषमा मांजरेकर यांचा सन्मान.!

271

वेंगुर्ला : पेंडूर सातवायंगणी येथील ओंकार कला क्रीडा मंडळातर्फे दीपावली शो टाईम कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षिका प्रा सौ. सुषमा प्रवीण मांजरेकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. मातोंडच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. मयुरी महेश वडाचेपाटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.h यावेळी माजी उपसभापती बाळु परब, ठाकरे शिवसेना तालुका प्रमुख बाळू परब, पेंदुरचे माजी सरपंच गीतांजली कांबळी, देवा कांबळी, मंडळाचे अध्यक्ष व ग्रां पं सदस्य नीलेश वैद्य, तरूण भारतचे उपसंपादक प्रवीण मांजरेकर, महेंद्र मातोंडकर, नाट्यकर्मी सौ गितली मातोंडकर, उत्तम वैद्य, सत्यवान वैद्य, ग्रा. पं. सदस्या कु हरजी, संपत नर्स, महेश वडाचेपाटकर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी सौ. मांजरेकर यांनी सत्कराबद्दल ऋण व्यक्त करून मंडळाच्या एकोप्याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काका सावंत यांनी तर आभार नीलेश वैद्य यांनी मानले.