गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना लाखो रुपये किमतीच्या मुद्देमालासह एक ताब्यात.! ; इन्सुली येथील उत्पादन शुल्क विभागाची कारवाई.!

102

बांदा : गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर वाहतूक करताना बलेनो कारवर गुरुवारी रात्री उत्पादन शुल्क विभागाच्या इन्सुली पथकाने कारवाई केली ही कारवाई मळेवाड या ठिकाणी करण्यात आली. या कारवाईत दोन लाख 24 हजार रुपयांची दारू व आठ लाख रुपये किमतीची बलेरनो कार असा एकूण दहा लाख 24 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला याप्रकरणी बेकायदेशीर दारू वाहतूक प्रदीप विश्वनाथ निगरे (वय 58, राहणार खारेपाटण) याला ताब्यात घेतला. ही कारवाई दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदीप रासकर, सहाय्यक धुळंदन, निरीक्षक गोपाळ राणे, जवान प्रसाद माळी, दीपक वायदंडे, रणजीत शिंदे आदींनी केली