देवगड : तालुक्यातील श्री देव स्थानेश्वर मंदिर, किंजवडे येथे कार्तिकोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त बुधवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी दुपारी ११ वा. पुण्याहवाचन, काकड आरती, रात्रौ ९ पासून : शिवकळा, पुराण, महाआरती, पालखी.
गुरुवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सकाळी. १०.३० वा. : गायन बैठक श्री. ज्ञानदेव येंडे.
रात्रौ. ११ वा. : सुश्राव्य कीर्तन (ह.भ.प. सौ. आरती सुनिल बापट, नारिंग्रे.)
शुक्रवार २४ नोव्हेंबर रोजी रात्रौ. ९.३० वा. : तुलसी विवाह, रात्रौ. ११.३० वा. : सुश्राव्य कीर्तन (ह.भ.प. श्री. रंगनाथ ज. साने, आचरा).
शनिवार २५ नोव्हेंबर सायं. ५.३० वा. : गायन बैठक श्री. अजित गोसावी, संगीत अलंकार.
रात्रौ ११ वा. श्री देव स्थानेश्वर नाट्यमंडळ, देऊळवाडी किंजवडे निर्मित दशावतारी नाट्यप्रयोग ‘कंसारीश्वर लिंग स्थापना’
रविवार २६ नोव्हेंबर संध्याकाळी ४ नंतर महाप्रसाद (प्रतीवर्षाप्रमाणे) तसेच रात्रौ. ९.३० वा. : सुश्राव्य भजन बुवा. श्री. संतोष धरणे श्री स्वामी समर्थ प्रा. भजन मंडळ, कलंबिस्त सावंतवाडी, रात्रौ ११.३० नंतर त्रिपूरोत्सव, शिवकळा, आरती, पालखी
सोमवार २७ नोव्हेंबर रोजी रात्रौ. ११ वा. नवदुर्गा गांगेश्वर नाट्यमंडळ, घाडीपाडावेवाडी यांचा दशावतारी नाट्यप्रयोग ‘गणेश पर्शुराम युध्द’.
तसेच समारोप प्रसंगी कीर्तन, लळीत समारोप
२२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर रोजी दररोज होणारे कार्यक्रम यात सकाळी १० वा. : सनईवादन, गायन बैठक, सायं. ५ वा.: सनईवादन, गायन बैठक. रात्री ९ नंतर पुराण, महाआरती, श्रींची पालखी, सनईवादन, कीर्तन, पहाटे काकड आरती.
तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच उत्सव निधी व मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन श्री देव स्थानेश्वर इनामदार देवस्थान कमिटी, किंजवडे बारापाच मानकरी व किंजवडे ग्रामस्थ यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ९४२१२३९०६०, ८०८०७३५८०५, ९४२०४१३१७५.



