देवगड : तालुक्यातील श्री देव गांगेश्वर मंदिर नारिंग्रेचा त्रिपुरीत्सव दि. २२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२३ या कालावधी सुरु असणार आहे. बुधवार, दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी उत्सवाला सुरुवात झाली असून या दिवशी रात्री १०.३० वाजता आमने-सामने फुगडी श्री देव गवळदेव फुगडी ग्रुप बोर्डवे (सुंदरवाडी) x श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ, कुडाळ (भैरववाडी) यांच्यात रंगली.
आज गुरुवार, दि. २३ नोव्हेंबर २०२३ रात्री १०.३० वा. आमने-सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा श्री. अभिषेक शिरसाठ (कोटेश्वर प्रासादिक भजन मंड मु.पो. हरकुळ, ता. कणकवली, पखवाज साथ रुपेश परब) आणि बुवा श्री. समीर कदम (श्री लिंगरवळनाथ भगवती प्रासादिक भजन मंडळ मु.पो. पोखरण, ता. कुडाळ) यांच्यात रंगणार आहे.
उद्या शुक्रवार, दि. २४ नोव्हेंबर २०२३ सायं. ५.०० वा. : तुलसी विवाह, शनिवार, दि. २५ नोव्हेंबर २०२३ रात्री ८.०० वा. ग्रामस्थांची भजने, रात्री १०.०० वा. लेझीम नृत्य.
रविवार, दि. २६ नोव्हेंबर २०२३, दुपारी १ ते ३ वाजता महाप्रसाद, रात्री ८ ते १० वा. : ब्राह्मणदेव महिला मंडळ, नाद (भोळेवाडी) यांचे समई नृत्य, रात्री १० ते ११ वाजता गजानन प्रासादिक भजन मंडळ हुर्शी, बुवा :श्री. अजित मुळम यांचे सुश्राव्य भजन असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
तसेच दिनांक २२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर रोजी दररोज होणारे कार्यकमात पुराण – श्री. अनिरुद्ध अभ्यंकर, महाआरती, सनई वादन श्रींची पालखी, तसेच कीर्तन कीर्तनकार ह.भ.प. श्री. भास्कर उर्फ अण्णा देसाई यांचे असणार आहे.
तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव गांगेश्वर देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थ, नारिंग्रे यांनी केले आहे.





