Home महाराष्ट्र देवगड श्री स्वामी समर्थ मठ वायंगणीतर्फे ऑल इंडिया सोलो डान्स चॅम्पियनशिपचे आयोजन.!

श्री स्वामी समर्थ मठ वायंगणीतर्फे ऑल इंडिया सोलो डान्स चॅम्पियनशिपचे आयोजन.!

58

देवगड : श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी यांच्या वतीने ११ व्या वर्धापन दिनानिमित्त ऑल इंडिया सोलो डान्स चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 25 डिसेंबर 2023 रोजी सदर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, तरी इच्छुक स्पर्धकांनी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

स्पर्धेत विविध बक्षिसे ठेवण्यात आली असून प्रवेश फी रु. 1000/- मात्र आहे. यात प्रथम क्रमांक रू. 20,000/- आणि चषक, द्वितीय क्रमांक रू. 10,000/- आणि चषक, तृतीय क्रमांक रु. 5000/- आणि चषक.
उत्तेजनार्थ पहिला रु.2000/-, उत्तेजनार्थ दुसरा रु. 2000/-, अधिक माहितीकरिता संपर्क सागर राणे (8411977806), मीनू (91527 18432)
टीप : सदर स्पर्धेकरिता स्पर्धकांची निवड व्हिडिओ ऑडिशन पद्धतीने केली जाईल. व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख 8 डिसेंबर राहील.