भारताचे न्यूझीलंडला जिंकण्यासाठी तब्बल ३९८ धावांचे आव्हान.! ; विराट, श्रेयसची दमदार शतके, राहुलचा फिनिशिंग टच.

41

मुंबई : विश्वचषक सेमी फायनलच्या नॉक आऊट सामन्यात आज भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडला चांगले झोडपले.

कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी जोरदार सलामी दिल्यानंतर विराट कोहलीचे दमदार शतक आणि श्रेयस अय्यरच्या आतिशी शतकामुळे भारताने धावांचा डोंगर उभारला. अंतिम काही षटकात केएल राहुलने जबरदस्त फिनिशिंग टच दिला ज्यामुळे भारताला 397 धावा उभारता आल्या. आता सेमी फायनल सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंड समोर 398 धावांचे लक्ष आहे.