भारताची वर्ल्डकप फायनलमध्ये दमदार एन्ट्री.! ; न्यूझीलंडला ७० धावांनी केले चितपट, मोहम्मद शमीचे ७ विकेट्स.

64

मुंबई : विश्वचषक सेमी फायनलच्या नॉक आऊट सामन्यात आज भारतीय संघाने न्यूझीलंडवर मात करीत अंतिम सामन्याचे तिकीट पक्के केले आहे.

आजच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडला चांगले झोडपले.
कर्णधार रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी जोरदार सलामी दिल्यानंतर विराट कोहलीचे दमदार शतक आणि श्रेयस अय्यरच्या आतिशी शतकामुळे भारताने धावांचा डोंगर उभारला. अंतिम काही षटकात केएल राहुलने जबरदस्त फिनिशिंग टच दिला ज्यामुळे भारताला 397 धावा उभारता आल्या. सेमी फायनल सामना जिंकण्यासाठी न्यूझीलंड समोर 398 धावांचे लक्ष होते.
मात्र भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
तेच गोलंदाज मोहम्मद शमीने सात विकेट घेत न्यूझीलंडला चितपट केले.
भारतीय संघाने दमदार 70 धावांनी विजय मिळविला. आता उद्या होणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातील विजेता संघ रविवारी भारताशी वर्ल्ड कपचा फायनल सामना खेळणार आहे.