युवा कामगाराने गळफास लावून संपवले जीवन.! ; जामसंडे शिळोम फाटा येथील घटना.

289

देवगड : जामसंडे – शिळोम फाटा येथील राहणारा विजापूर येथील कामगार अशोक तुकाराम पांढरे (वय 26) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. वळकुवाडी येथील जंगलमय भागात झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मृत अवस्थेत सापडला. ही घटना आज सोमवारी सकाळी ६:२० वा सुमारास निदर्शनास आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ विजापूर येथील पांढरे कुटुंबीय हे शिरोम फाटा येथे त्यांचे घर असून या घरात अशोक तुकाराम पांढरे व त्यांचे तीन भाऊ पत्नी आई वडील व मुले ही १३ वर्षे राहतात. अशोक हा मोलमजुरी करत होता त्याला दारूचे व्यसन होते. रविवारी रात्री तो घरी आला नाही म्हणून त्याचा भाऊ सुभाष व घरातील लोकांनी त्याचा सोमवारी सकाळी त्याचा शोध घेतला यावेळी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वळकुवाडी शिळोम जंगलमय भागात मोईच्या झाडाला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास लावलेला स्थितीत मृतस्थितीत दिसला. त्याच्या भाऊ सुभाष याने याबाबत देवगड पोलिसात कळविल्यानंतर पोलीस हवालदार राजन जाधव व पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन गळफास लावलेल्या स्थितीत असलेल्या अशोक तुकाराम पांढरे यांना खाली घेतले. व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेची खबर सुभाष तुकाराम पांढरे यांनी देवगड पोलिसात दिली असून देवगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे याबाबत अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव करत आहेत.