माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र..!
कुडाळ: राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कुडाळ तालुका अध्यक्षपदी अँड.स्वाती पालयेकर यांची नियुक्ती करण्यात आली. खासदार सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी युवती काॅग्रेस प्रदेश अध्यक्षा कु.सक्षणा सलगर यांच्या मान्यतेने युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर यांनी तालुका अध्यक्ष पदाचे निवड करण्यात आली.सावंतवाडी रविंद्र मंगल कार्यालयात आयोजीत जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर निरीक्षक शेखर माने,माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा तथा कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे-परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे,युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर, सोशल मिडीया कोकण विभागीय अध्यक्ष प्रा.सचिन पाटकर, कुडाळ तालुकाध्यक्ष शिवाजीराव घोगळे, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश जाधव आदी. पदाधिकारी उपस्थित होते.





