मुंबई – गोवा महामार्गावर रिक्षा – टेम्पोचा भीषण अपघात, महिला जागीच ठार! ; दोन जण गंभीर जखमी, रक्ताचा अभिषेक थांबणार कधी? प्रवाशांचा संताप.

585

रोहा : शशिकांत मोरे

मुंबई – गोवा या राष्ट्रीय महामार्गावर सततच्या होत असलेल्या अपघातामुळे रक्ताच्या होत असलेल्या अभिषेक काही थांबण्याचे नाव घेत नाही.कोलाड आंबेवाडी नाक्यावर रात्री रिक्षा आणि मालवाहू टेम्पो यांच्यात जोरदार धडक झाली.सोमवारी रात्री झालेल्या या धडकेत एक महीला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या धडकेत रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाल्याने कोलाड आंबेवाडी नाक्यावर प्रवासी वर्गाने चांगलाच संताप व्यक्त केला.
दरम्यान कोलाड ठिकाणी घडलेल्या या अपघाताबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आपल्या ताब्यातील आयशर टेंपो क्र एम एच १२ यू एम ४५३६ हा मुंबई गोवा हायवे रोडने महाड बाजूकडे जात असताना मौजे आंबेवाडी हददीत सरकारी हॉस्पीटल जवळ महाड बाजुकडुन मुंबई बाजुकडे येणारी रियर रीक्षा एम एच ०६ बी व्ही ४६४२ ही वरील चालक यांने सदरची रिक्षा अतीवेगाने हाइगइने बेदकारपणे चालवुन त्याच्या विरुध दिशेला जावून टेम्पोच्या उजव्या बाजूला मागील बाजुचे गाडला धडकल्याने अपघात झाला.दरम्यान अपघातामध्ये रिक्षा मधील मागे बसलेल्या भागीरथी खार रोहा येथील अन्वी किसन गायकर (२) हीला गंभीर स्वरुपाच्या दुखापती झाल्या तर सेजल किसन गायकर (३१) या महिलेस गंभीर स्वरुपाची दुखापती होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला.तर किसन गायकर (३२) हे किरकोळ जखमी झाले असून या जोरदार झालेल्या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस उपनिरीक्षक अजित साबळे यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेबाबत माहिती घेऊn घडलेल्या घटनेची कोलाड पोलिस ठाण्यात ९६ /२०२३ भादवी सं कलम ३०४, अ २८९,३३७,३३८,मोटर वाहन कायदा १८४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.तर घटनेचा रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी वर्ग अधिक तपास करीत आहेत.