रोहा : शशिकांत मोरे
मुंबई – गोवा महामार्गावर खांबजवळ वैजनाथ गावानजीक असलेल्या सुरगडाच्या संवर्धन मोहिमेला येथील स्थानिक शिलेदारांनी सुरुवात केली आहे.पावसाचा जोर ओसरल्याने परतीच्या पावसानेही आपली वाट धरल्याने सुरगडाच्या शिलेदारांनी दसरा गडपुजनासाठी किल्ले सुरगडाच्या स्वच्छतेकडे लक्ष घातले.गडावर जाणारा मार्ग आणि त्यालगत वाढलेली काटेरी झुडपे आणि गवत तर पावसामुळे रस्त्यार काही ठिकाणी रहदारीला अडचण ठरत असेलेले दगड गोटे बाजूला करून वाट मोकळी करण्यासाठी पुन्हा स्थनिक सुरगडाचे शिलेदारानी आपल्या गड संवर्धन मोहिमेला सुरुवात केली.
मागील वर्षभरात गडावर पावसाळ्यापूर्वी या शिलेदारांकडून तब्बल २२ मोहीम राबविण्यात आल्या होत्या.या मोहीमेअंतर्गत गडावरील स्वच्छ्ता तसेच संवर्धन करीत सहा पाण्याच्या टाक्या साफ करण्यात आल्या तर स्वच्छ्ता व संवर्धनात काही शिवकालीन सापडलेल्या पुरातन तोफ व शिवकालीन शीळा यांचे पावसाळ्याआधी सुरक्षित जागेत या शिलेदारांकडून संवर्धन करण्यात आले होते तसेच गडावर हनुमान मंदिर, शिवकालीन मंदिर,रहाळ परिसरात स्थानिक सुरगाडाचे शिलेदार आणि सामजिक वनविभाग रोहा,लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने वेगवेगळ्या झाडांची लागवड तसेच रंगी बेरंगी फुलांची लागवड करण्यात आली होती.त्यामुळे या शिलेदारांना पुन्हा गड संवर्धनाची ओढ लागली .
स्थानिक सुरगड संवर्धन संस्थेच्या २३ व्या मोहिमेसाठी मयुर कापसे,अजय भोसले,किशोर सावरकर,पंकज सावरकर, अस्मित महाडीक, नितेश कोंडे, जयेश बावकर, अजित कदम, विलास सुर्वे, ललित जाधव, साहिल जाधव, रोशन जाधव, अथर्व कापसे, विशाल पवार, विवेक तांडेल, मंदार पार्टे, विश्वास सानप, श्रीकांत जंगम, मंदार जाधव, सुमित खेडेकर, रितेश पवार, स्वप्निल विचारे, करण महाबळे, संस्कार महाबळे, सिद्धेश शेलार, शांताराम बाईत, मयूर मालुसरे सह स्थानिक सुरगडाचे शिलेदारांनी आपला सहभाग नोंदवत ही मोहीम यशस्वी केली.
मोहिमेत सहभागी झालेल्या सुरगड संवर्धन शिलेदारांचा उत्साह पाहता येणारा दसरा गडपुजनाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार हे मात्र नक्की.या मोहिमेमधे सहभागी सर्व सुरगडाच्या शिलेदारांचे संस्थापक अध्यक्ष अजय भोसले यांनी सर्वांचे यावेळी आभार मानले.





