देवगड : देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्ण सल्लागार समितीची बैठक आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाल्यानंतर ग्रामीण रुग्णालयामध्येच उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यामध्ये व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की व हाणामारी होवून सुमारे पाऊन तास चाललेल्या या संघर्षमय वातावरणामुळे परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जात होती पोलीसांसमोर झालेल्या या घटनेमुळे शांततेमध्ये असलेले देवगड अशांत बनले आहे.आता पर्यंतच्या देवगडच्या ईतिहासामधील पक्षांमध्ये समोरासमोर धक्काबुक्की व हाणामारी होण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.

देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्ण सल्लागार समितीची बैठक सोमवार 3 वाजता नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आली होती. याचवेळी शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख गणेश गावकर,नगरसेवक बुवा तारी,संतोष तारी, तालुका प्रमुख जयेश नर,संतोष दळवी, हर्षा ठाकुर,काँग्रेसचे तालुका प्रमुख उमेश कुळकर्णी, उल्हास मणचेकर व महाविकास आघाडीचे काहि कार्यकर्ते ग्रामीण रुग्णालय देवगडमध्ये या समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक व देवगड ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक यांना समस्यांबाबत जाब विचारण्यासाठी गेले होते. दरम्यान ग्रामीण रुग्णालयामधील रुग्ण सल्लागार समितीची बैठक संपूण आमदार नितेश राणे बाहेर येत असतानाच त्यांच्या सोबत भाजपा कार्यकर्ते देखील उपस्थित असतेवेळी उबाठा सेनेच्या व भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आमदार नितेश राणे यांच्या समोरच शाब्दीक चकमक झाली. याचे रुपांतर हाणामारीतही घडले यामुळे दोन पक्षांमध्ये झालेल्या राडयामुळे ग्रामीण रुग्णालयातील वातावरण तणावाचे झाले होते. अखेर आमदार नितेश राणे यांनी सांगितले विरोधी पक्षाचे कार्यकर्ते असले तरी देखील मी त्यांचा देखील आमदार आहे काय प्रश्न असतील तर ते मला सांगा मी ते सोडविण्याचा प्रयत्न करतो मात्र दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावरती धावून जात होते. पोलीसांसमोरही या झालेल्या प्रकारामुळे शांतमय असलेले देवगड अशांततामय झाले आहे. रुग्णालयातील रुग्ण उपचार घेत असतानाच सदरच्या घटनेमुळे रुग्णालयातील रुग्ण देखील भयभिंत होवून पळून जात होते. मात्र दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी असल्यामुळे त्यांना पळुन जाता येत नव्हते. काहि रुगण भितीपोटी व हाणामारीमुळे घाबरुन शौचालयात दडुन बसले होते. आमदार नितेश राणे व पोलीसांसमोर झालेल्या दोन्हीही पक्षाच्या हाणामारीची चर्चा संपुर्ण देवगड वर्तुळात चर्चीली जात आहे. गेली काहि दिवस देवग्ड ग्रामीण रुग्णालयातील कर्मचा-यांच्या रिक्त पदांबाबत शिवसेना उबाठा सेनेच्यावतीने निवेदन देण्याचे व जाब विचारण्याचे प्रकार चालू होते. याचे अखेर पडसाद भाजपा व उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यामुळे देवगड तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेमधील रुग्णालयातील समस्यां सोडविण्याबाबत राजकीय लोकप्रतिनिधींनी केलेले कृत्य यामुळे रुग्ण समस्यां सोडविल्या जातील का असा सवालही उपस्थित केला जात आहे.





