आगामी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपचे सुपर वॉरियर्स सज्ज.! ; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 17 रोजी जिल्ह्यात येणार – अतुल काळसेकर

59
  1. सावंतवाडी : आगामी निवडणुका जिंकण्यासाठी 108 ते 110 सुपर वॉरियर्स नियुक्त करण्यात आले असून महाविजय संकल्प 2024 साठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कोकण दौऱ्यावर येत आहेत.
    19 ऑक्टोबरला ते कणकवली येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली.
    सावंतवाडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, महेश सारंग, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, एकनाथ नाडकर्णी, संजू परब, राजन म्हापसेकर, श्वेता कोरगावकर, रवींद्र मडगावकर, महेश धुरी, प्रथमेश तेली, अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, प्रमोद कामत आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळातील विविध योजना, विकास कामे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यातील कामगिरी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे हे 17 ऑक्टोबरपासून कोकण दौऱ्यावर येत आहेत. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी 19 ऑक्टोबरला सायंकाळी तीन वाजता कणकवली येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील.
महाविजय संकल्प 2024 या अभियानात प्रत्येक घरोघरी वारियर्स जाऊन मातीचा कलशामध्ये तीनशे आठ ठिकाणाहून आणलेली माती गोळा करून कणकवलीत जमा करून ती दिल्ली येथे पाठवण्यात येणार आहे. दिल्ली या ठिकाणी शहिदांच्या स्मारकातील अमृतवाटिकेला ही माती अर्पण केली जाणार असल्याचे अतुल काळसेकर यांनी सांगितले.

दरम्यान, वेळागर येथील ताज हॉटेलच्या जमिनीबाबत राजन तेली यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, वेळागारवासीयांची भूमिका समजावून घेऊन योग्य निर्णय घेण्यात यावा. गेली 32 वर्षे हे जमीन मालक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. काम कोणी केले याला आपला विरोध नसल्याचेही तेली म्हणाले.