यापुढे उबाठा शिवसेना जशास तसे उत्तर देईल.! – गणेश गावकर.

166

देवगड : आमदार नितेश राणे यांच्याबद्दल केलेले विधान भाजपा कार्यकर्त्यांना झोपल्यामुळे ग्रामीण रुग्णालयामध्ये आज आमदार नितेश राणे यांच्या समोरच त्यांच्या कार्यकर्त्यांनी शाब्दिक बाचाबाची व नंतर मारामारी पर्यंत मजल मारली अशा प्रकारचे घटना देवगड तालुक्याच्या इतिहासात प्रथमच घडली आहेत. आणि याची सुरुवात आमदार नितेश राणे यांनी सुरू केली असून आपल्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दबविण्याचा प्रयत्न त्यांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी देवगड पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी नगरसेवक बुवा तारी यांनी मारामारीच्या घटनेवेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली असा आरोप देखील केला आहे.

या पत्रकार परिषदेला तालुकाप्रमुख जयेश नर नगरसेवक संतोष तारी माजी नगरसेविका सौ हर्षा ठाकूर काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी उल्हास
मणचेकर तुषार भाबल, सज्जाउद्दीन सोलकर, निनाद देशपांडे, आदी उपस्थित होते.
यावेळी गणेश गावकर म्हणाले की ग्रामीण रुग्णालयाबद्दल ग्रामीण रुग्णालयातील दुरावस्थेबाबत शिवसेना उबाठा सेना आणि काँग्रेस यांच्यावतीने सातत्याने आंदोलन करीत आहोत सोमवारी याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय विटकर यांना आश्वासनाची पूर्तता झाली का याची विचारणा करण्यासाठी गेले होते आमचे पदाधिकारी गेले होते मात्र त्यांच्याकडून कोणतीही समर्पक उत्तरे मिळाली नव्हती म्हणून सायंकाळी समितीच्या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक येणार आहेत अशी माहिती विटकर यांनी आम्हाला दिली होती. त्यासाठी सायंकाळी चार वाजता पदक पदाधिकारी यांच्या समवेत मी रुग्णालयात आम्ही गेलो होतो यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांना फोन केला असता त्यांनी आपण एका बैठकीत असल्याने सांगितले व या मीटिंग बाबत आपल्याला काही माहीत नाही असे सांगितले यावरून डॉ विटकर आणि शल्य चिकित्सक यांनी आमची फसवणूक केली असा आरोप यावेळी गावकर यांनी केला दरम्यान आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक यांना भेटायला गेलो होतो. यावेळी तबेला सभेला आलेल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांबरोबर मारामारी केली मारामारीची घटना शांत असणाऱ्या देवगड तालुक्यात घडली असून त्याची सुरुवात आमदार नितेश राणे यांनी केली आहे ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यापेक्षा सकाळी उठून उठून शिवसेना खासदार संजय राऊत यांचा जप करायचा हा एक कलमी कार्यक्रम आमदार नितेश राणे करत आहेत दमदाटी करून आवाज दाटण्याचा प्रयत्न यापुढे शिवसेनेचे कार्यकर्ते सहन करणार नाहीत त्याला जशास तसे उत्तर देऊ असे देऊ असा इशारा युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी दिला आहे.