मालवण : मसुरे खेरवंद येथील युवा कार्यकर्ते निलेश भालचंद्र सातार्डेकर (वय ४०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन बहिणी, भावोजी, भाचे, चुलत भाऊ, काका, काकी असा मोठा परिवार आहे. खेरवंद येथील आप्पा सातार्डेकर, तथा निवृत आदर्श शिक्षक विजय सातार्डेकर, जि. प. प्राथमिक शाळा जामसंडे – देवगड नंबर १ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विनया सातार्डेकर यांचे निलेश पुतणे होत.





