नेदरलँडच्या गोलंदाजांनी कमावलं, पण कचखाऊ फलंदाजीनं गमावलं.! ; वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा भारत भूमीत पहिला विजय.

23

हैदराबाद :  नेदरलँडच्या गोलंदाजांनी केलेल्या केलेल्या दमदार कामगिरीमुळे बलाढ्य पाकिस्तानला 286 धावांमध्ये रोखण्यात यश आले होते. मात्र, फलंदाजांनी तोच बाणा न दाखवल्याने 81 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. नेदरलँडकडून बॅस दे लीडेनं दाखवलेली अष्टपैलू कामगिरी सुद्धा नेदरलँडला पराभवापासून वाचवू शकली नाही. त्यामुळे 205 धावांमध्ये नेदरलँडला गुंडाळून पाकिस्तानने स्पर्धेत विजयी श्रीगणेशा केला. नेदरलँडकून विक्रम सिंगने अर्धशतकी खेळी केली. मधल्या फळीतील बॅस दे लीडेनं 98 चेंडू 67 धावा पटकावल्या. व्यतिरिक्त कोणत्याच फलंदाजाला पाकिस्तानच्या गोलंदाजांचा प्रतिकार करता आला नाही. त्यामुळे त्यांचा डाव 205 धावात गुंडाळला गेला.

पाकिस्तान कडून शाहीन आफ्रिदीनं एक विकेट घेतली. हसन अलीनं दोन विकेट घेतल्या, हॅरीस रौफनं तीन विकेट घेतल्या. तर इप्तिकार अहमद, मोहम्मद नवाज आणि शादाब खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. पाकिस्तानच्या माऱ्यासमोर नेदरलँडच्या मधल्या फळीची कोणतीच मात्रा चालली नाही. त्यामुळे नेदरलँडला पराभवाला सामोरे जावे लागले.

रिझवान, सौद शकीलच्या खेळीने सावरले –

वर्ल्डकपच्या सलामीच्या सामन्यात अत्यंत सोपा असा पेपर असलेल्या पाकिस्तानला दुबळ्या असणाऱ्या तुलनेतील दुबळ्या असणाऱ्या नेदरलँडने अक्षरशः घाम फोडला. नेदरलँडने केलेल्या भेदक गोलंदाजीने पाकिस्तानच्या कोणत्याही फलंदाजाला जग धरता आला नाही. त्यामुळे पाकिस्तानला समोर दुबळा प्रतिस्पर्धी असूनही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पाकिस्तानला 49 षटकांत 286 धावांवर गुंडाळत नेदरलँडने दमदार कामगिरी केली. नेदरलँडकडून बॅस दे लीडेनं भेदक मारा करताना पाकिस्तानच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले. आर्यन दत्त, लाॅगन वॅन बीक, काॅलिन अॅकरमन आणि पाॅल वॅन मिकेरेने यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

मधल्या फळीतील मोहम्मद रिजवान आणि सौद शकीलने केलेल्या अर्धशतकीय खेळीनंतर पाकिस्तानच्या डावाला आकार आला. या दोघांनी मिळून चौथ्या विकेटसाठी 138 धावांची भागीदारी केल्यामुळे पाकिस्तानला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. मोहम्मद रिजवान 68 धावांवर बाद झाला. सौद शकीलही 68 धावांवर बाद झाला. त्यानंतर इफ्तिकार अहमदही बाद झाल्याने पाकिस्तानची अवस्था 6 बाद 188 अशी झाली. यानंतर पाकिस्तान किमान सन्मानजनक धावसंख्या उभारतो की नाही? अशी शंका निर्माण झाली होती. मात्र, मोहम्मद नवाज आणि शादाब खान यांनी केलेल्या छोटेखाली खेळीमुळे पाकिस्तानला कशीबशी अडीचशेपर्यंत मजल मारता आली.

मात्र त्यानंतरही नेदरलँडने दोघांनाही झटपट बाद करत पाकिस्तानला मोठ्या धावसंख्येपासून रोखलेय. नेदरलँडचा मारा सुरुवातीपासूनच संयमित राहिला. त्यामुळे एकंदरीत पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. नाणेफेक गमावल्यानंतर कर्णधार बाबर आझम आम्ही 300च्या वर स्कोअर करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, एकंदरीतच पाकिस्तानची फलंदाजांची फळी नेदरलँडच्या गोलंदाजीसमोर कमजोर दिसून आली.