सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील नगरपरिषद हद्दीतील व खाजगी जागेतील धोकादायक झाडे व काही धोकादायक घटक यांचे सर्वेक्षण करून त्यावर पालिकेने कारवाई करण्याकरिता ‘सामाजिक बांधिलकी’ नगरपरिषदेला साथ देणार आहे.
सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आज सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन सावंतवाडी शहरातील धोकादायक झाडांची त्वरित सर्वेक्षण करून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंती केली. सदर निवेदने सार्वजनिक बांधकाम विभाग, तहसीलदार व उपविभागीय अधिकारी महसूल देण्यात आली सदर निवेदनामध्ये असे म्हटले आहे की सावंतवाडी शहरातील खाजगी व नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावर व घरांवर झुकलेली धोकादायक झाडे तोडून घेण्यासाठी नगरपरिषदेला सामाजिक बांधिलकी साथ देणार आहे. त्यावेळी मुख्याधिकारी म्हणाले की आपली साथ लाभली तर आणखी काम सोपं होईल आपली साथ आम्ही नक्कीच घेऊ कारण शहरात घडलेली घटना ही दुर्दैवी आहे या प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये या दृष्टिकोनातून पावले उचलली जाणार आहेत. येत्या पंधरा दिवसांमध्ये धोकादायक झाडांचे सर्वेक्षण होईल त्यानंतर धोकादायक झाडे तोडले जातील. नैसर्गिक आपत्तीमुळे त्या दुर्घटना घडू नये म्हणून सामाजिक बांधिलकी तळमळीने काम करत आहे. अडीअडचणीच्या वेळी सामाजिक बांधिलकी प्रत्येकाच्या मदतीला धावणार आहे अशी ग्वाही सामाजिक बांधिलकीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी दिली. त्यावेळी सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते प्रा. सतीश बागवे, संजय पेडणेकर ,अशोक पेडणेकर, समीरा खलील, हेलन निबरे, शेखर सुभेदार व रवी जाधव उपस्थित होते.





