मालवण (प्रतिनिधी)
नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण व कुडाळ तालुक्यात आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना मा.आम. वैभव नाईक यांची उपस्थिती
मालवण व कुडाळ तालुक्यात आज नारळी पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थिती दर्शविली. मालवण तालुका व्यापारी संघ व मच्छीमारांसमवेत मा. आ. वैभव नाईक यांनी समुद्राला नारळ अर्पण केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बंड्या सरमळकर मित्रमंडळाच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या नारळ लढविणे स्पर्धेचे उदघाटन मा. आ. वैभव नाईक व मा. आ. परशुराम उपरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच मालवण तालुका व्यापारी संघ आणि लायन्स क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेची वैभव नाईक यांच्या हस्ते नाणेफेक करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. त्याचबरोबर अरविंद मोंडकर यांच्या मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या नारळ लढविणे स्पर्धेला वैभव नाईक यांनी भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी वैभव नाईक यांनी जिल्हावासियांना आणि मच्छीमारांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.कुडाळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित रिक्षा सेनेच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त कुडाळात रिक्षा रॅली काढण्यात आली. यावेळी मा. आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भंगसाळ नदीत नारळ अर्पण करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे,माजी पं.स. सदस्य अतुल बंगे, शहरप्रमुख संतोष शिरसाट,उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, सुशील चिंदरकर,गुरू गडकर, अमित राणे,संदीप म्हाडेश्वर, शेखर गावडे, विनय गावडे,गुरु सडवेलकर,सचिन ठाकूर, अशपाक कुडाळकर, रमेश हरमलकर, विनोद शिरसाट, रिक्षा सेनेचे संजय मसुरकर, बाळा वेंगुर्लेकर,नागेश दळवी,दाजी गावडे,प्रवीण पालव,शामा परब आदी उपस्थित होते.
मालवण येथे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना समन्वयक मंदार ओरसकर,पूनम चव्हाण,दीपा शिंदे,श्वेता सावंत, महेश जावकर,बंड्या सरमळकर,उमेश मांजरेकर, अन्वय प्रभू,तृप्ती मयेकर,निनाक्षी मेथर,रूपा कुडाळकर,भाग्यश्री लाकडे खान,सचिन मालवणकर,सिद्धेश मांजरेकर, किरण वाळके,हेमंत मोंडकर,मनोज मोंडकर,भगवान लुडबे,यशवंत गावकर,दीपक देसाई,माधुरी प्रभू,नीना मुंबरकर, रश्मी परुळेकर,नरेश हुले, सोनाली डीचवलकर,दादा जोशी, गणपत आडिवरेकर,चिंतामणी मयेकर,मंदा जोशी,अक्षय भोसले,चंदू खोबरेकर,नारायण रोगे,रवी मिटकर, राहुल जाधव, सुधीर चिंदरकर,प्रथमेश सरमळकर, गौरव वेर्लेकर, विशाल सरमळकर, भार्गव खराडे,संदेश लाड,प्रसाद चव्हाण,लक्ष्मी पेडणेकर,दादा पाटकर,प्रथमेश बिरमोळे,पूजा तळाशीलकर,किशोर गावकर, सुर्वी लोणे,गजा शिरोडकर राधिका मोंडकर आदी उपस्थित होते.





