हांगझोऊ : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम आणि मराठमोळ्या ओजस देवतळे यांनी कंपाऊंड आर्चरी मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिलं. ओजस देवतळे आणि ज्योतीच्या जोडीने तिरंदाजी मिश्र स्पर्धेत भारताला 16 वं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. मराठमोळा ओजस देवतळे मूळचा नागपूरचा आहे.





