तुळस येथे श्री शिवाजी हायस्कूलमध्ये कर्मवीर जयंती सोहळा उत्साहात साजरा.!

46

सावंतवाडी : रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी हायस्कूल तुळस या विद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर शिक्षण महर्षी, पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य जे. के. (बापू) जाधव,
राजेंद्र साळुंखे सहसचिव (माध्यमिक) रयत शिक्षण संस्था आणि विभागीय अधिकारी मध्य विभाग, रयत शिक्षण संस्था सातारा उपस्थित होते. तसेच प्रमुख वक्ते, लेखक डी. ए. माने (माजी प्राध्यापक, रामानंद कॉलेज), संदीप जावळे सर (उपशिक्षक कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, म्हैशाळ), स्कूल कमिटी सदस्य मकरंद परब, तुळस जैतिरश्रित संस्थाचे कार्यवाह बन्सी चव्हाण, शाळेचे थोर देणगीदार सुधीर झांट्ये, शाळा समिती सदस्य पराग सावंत, सौ. सुजाता पडवळ, सगुण माळकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. अस्मिता कुंभार, ग्रामपंचायत सदस्य जयवंत तुळसकर, प्रकाश परब, मंगेश राऊळ, पिंट्या राऊळ, अजय नाईक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, तसेच  पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

यावेळी जे. के. (बापू ) जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कर्मवीर भाऊराव पाटील यांचेविषयी माहिती सांगितली. मुलांनी जिद्द ,चिकाटी हे गुण त्यांच्याकडून घ्यावेत, असेही नमूद केले. तसेच प्रमुख वक्ते प्रा. माने सर यांनी कर्मवीरांच्या जीवनपट विद्यार्थ्यांसमोर उलगडला.
श्री. जावळे सर यांनी गोष्टी रूपाने कर्मवीरांचे गुण विद्यार्थ्यांना सांगितले आणि आताच्या काळात विद्यार्थ्यांनी नेमके काय केले पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप तुळसकर यांनी केले.  प्रास्ताविक विद्यालयाचे नवनियुक्त मुख्याध्यापक अँथोनी डिसोजा यांनी केले. पारितोषिक वितरण सौ.अश्विनी आडके मॅडम यांनी केले. बैठका व्यवस्था प्रवीण सानप आणि  बबन घोडे सर, प्रमाणपत्र लेखन बाबासो चौगुले सर तर आभार सूर्यकांत सुतार यांनी मानले.