कलंबिस्त हायस्कूलचे विविध क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश.!

125

सावंतवाडी : दाणोली येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडास्पर्धांत कलंबिस्त हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले. यामध्ये कु. श्रेया सुनील तावडे उंच उडी – प्रथम क्रमांक पटकावला असून जिल्हास्तरासाठी तिची निवड झाली आहे. तसेच लांब उडीत द्वितीय क्रमांक मिळवत जिल्हास्तरासाठी निवड, मंदार सत्यविजय राऊळ – उंच उडी – प्रथम क्रमांक -जिल्हास्तरासाठी निवड, दिव्या श्याम राऊळ – उंच उडी – द्वितीय क्रमांक जिल्हास्तरासाठी निवड, तन्वी दशरथ पास्ते – उंच उडी – तृतीय क्रमांक, प्रिती शरद मेस्त्री – उंच उडी – तृतीय क्रमांक, संकेत कृष्णा जाधव – लांब उडी – तृतीय क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक प्रकाश पावरा यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक अभिजीत जाधव व शिक्षक –  शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.