मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिवसेनेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र की अपात्र, याबाबत सुप्रीम कोर्टात येत्या ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी पार पडणार होती. मात्र, आता पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर पडल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पुन्हा ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे. दरम्यान अपात्र आमदारांच्या सुनावणीबाबतीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. ठाकरे गटाचे
या याचिकेवर सुनावणी घेताना कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारलं होतं. विधानसभा अध्यक्षांनी दोन आठवड्यात आमदार अपात्र प्रकरणाच्या सुनावणीचा रोडमॅप सादर करण्याच्या सूचना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या होत्या. यावर ६ ऑक्टोबरला सुनावणी घेतली जाईल, असं कोर्टाकडून सांगण्यात आलं होतं. त्यानुसार अध्यक्षांनी आमदारांची एक सुनावणी घेत पुढील वेळापत्रकही तयार केलेलं होतं.
मात्र, आता न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली असल्याची माहिती आहे. प्रकरण लिस्टेड न झाल्याने ही सुनावणी ९ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची माहिती आहे.
आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली होती.





