हांगझोऊ : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या धावपटू अविनाश साबळे याने एशियन गेम्सच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे. तर ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. तसेच आशियाई स्पर्धेतील भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक आहे. चीनमधून भारतासाठी ही भारतासाठी ही ‘गोल्ड’ बातमी आलीये. तर अविनाशच्या या कामगिरीसाठी त्याच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. तर आता भारताच्या खात्यात सुवर्ण पदकांची संख्येत वाढ झाली आहे.
चीनमध्ये सुरु असेलल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरु आहे. सातव्या दिवसाअखेर भारताची पदक संख्या 38 पर्यंत पोहचली आहे. भारत गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. यजमान चीन अव्वल स्थानावर आहे. जपान दुसऱ्या तर रिपब्लिक ऑफ कोरिया तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
मराठमोळा अविनाश साबळे –
अविनाश पहिली ते पाचवीपर्यंत गावातील जिल्हा परिषद शाळेमध्येच शिकला घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळं त्याचे आई-वडील वीटभट्टीवर काम करायचे आणि त्यातही त्यांना तो मदत करायचा. शाळेत जाताना आणि येताना तो धावण्याचा सराव करायचा. त्याच्या याच सर्वामुळे 2005 मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्यांना पहिला नंबर पटकावला होता. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अविनाशला ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आला नसला तरी, स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता.








