बांदा: मुसळधार पावसाने आज शेर्ले येथील सागर बापू मेस्त्री यांच्या राहत्या घराची मातीची भिंत कोसळून १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले.
आज दिवसभर बांदा परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. आज सकाळी मेस्त्री यांच्या घराची मातीची भिंत कोसळली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. बांदा तलाठी फिरोज खान यांनी नुकसानीचा पंचनामा केला.
या घटनेत भिंतीसह कौलारू छप्पर, लाकडी वासे व घरातील सामानाचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली.








