विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा.! ; संदेश पारकर यांची मंत्री मुंडे यांच्याकडे मागणी.

45

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू फळपीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा तसेच कर्जमाफी पासून वंचित राहिलेल्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेऊन केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना अद्याप विमा योजनेचा लाभ मिळालेला नाही. राज्य व केंद्र सरकारने विमा हप्ता न भरल्याने शेतकऱ्यांना सुमारे 120 कोटी रुपयांची मिळणारी भरपाई प्रलंबित राहिली आहे.