अखेर देवगड दहीबाव पूरक योजनेवरील पंप दुरुस्त.!

28

देवगड : देवगड – जामसंडे नगरपंचायतीला पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आमदार नितेश राणे यांचे प्रयत्न यशस्वी ठरले असून दहिबाव पाडाघर योजनेतील पंप दुरुस्ती पूर्ण झाली आहे. हा पंप बुधवारी बसवण्यात आला. शिरगाव पाडाघर योजना ही दुरुस्त झाली असून त्याचा पाणीपुरवठा देवगडला झाला आहे.

दहिबाब पूरक पाणी योजना दुरुस्त झाल्याने 10 लाख लिटर पाणी उपसा आता 20 लाख लिटर पर्यंत होणार आहे. याची मोटर दुरुस्त करून आणण्यात आली होती. त्याला महिना उलटला आमदार नितेश राणे यांच्या बैठकीनंतर हालचाली तातडीने सुरू झाल्या होत्या.