ट्रॅव्हल्स चालकांचा प्रामाणिकपणा.! ; सोन्याची वस्तू प्रवाशाला केली परत.!

46

पाली : आर्या ट्रॅव्हल्समधून मुंबई ते पाली असा प्रवास करणाऱ्या एका महिलेचे सोन्याचे कानातले ट्रॅव्हल्समध्ये पडले होते. ती महिला पाली या ठिकाणी उतरल्यानंतर काही वेळाने तिला आपल्या एका कानात कानातले नसल्याचे लक्षात आल्यावर कॉन्टॅक्ट करून ट्रॅव्हल्समध्ये कानातल पडलं आहे का ते पहायला सांगितले. यावेळी चालक बंटी पांचाळ, केदार तारी, प्रसाद केसरकर, मनोज गुरव यांनी पूर्ण शोधाशोध सुरु केल्यावर त्यांना ट्रॅव्हल्समध्ये कानातले सापडले. त्यांनी त्या महिलेला कॉन्टॅक्ट करून कानातले त्या महिलेच्या हाती सुपूर्द केले.