देवगड : कसाल येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जात असताना तळेबाजार येथील मायलेकावर काळाने घाला घातला. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास तोरसोळे फाटा येथील धोकादायक वळणावर ट्रक आणि इंडिका कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तळेबाजार येथील व्यापारी महेश मोहन तोरस कर(४८)व यांची आई मनीषा मोहन तोरसकर(७८) या मायलेकांचा जागेत मृत्यू झाला आहे. तर त्यांच्यासोबत कार मध्ये असलेले गुरुनाथ श्रीराम पारकर वय (५५) व त्यांची पत्नी नीता गुरुनाथ पारकर वय (४५) या अपघातात गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातात इंडिका कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ट्रकची जोरदार धडक बसल्यानंतर कार डाव्या बाजूला फेकली गेली. तर अपघातानंतर तासाभराने अपघात ग्रस्त ट्रकनेही अचानक पेट घेतला. पोलिसांनी प्रसंगावरून राखून रस्त्यावरून जाणाऱ्या दोन्ही बाजूंची वाहनांना थांबविले होते.तात्काळ कणकवली नगरपंचायत अग्निशामक बंब बोलावल्याने आग आटोक्यात आली. या अपघातात तळेबाजार येथील व्यापारी महेश तोरसकर व त्यांची आई मनीषा तोरसकर यांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी कळताच तळेबाजार बाजारपेठ बंद ठेवून हळहळ व्यक्त करण्यात आली.

अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तळेबाजार बाजारपेठेतील ज्योतिर्लिंग जनरल स्टोअरचे मालक महेश मोहन तोरसकर शनिवारी आठ वाजण्याच्या सुमारास कसाल येथे आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी आपल्या ताब्यातील एम. एच. 07 क्यू 3850 या टाटा इंडिका कारने जात होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत त्यांची आई मनीषा तोरसकर व श्रीराम जनरल स्टोअरचे मालक गुरुनाथ श्रीराम पारकर व त्यांची पत्नी निता पारकर असे चार जण होते.

देवगड – नांदगाव मार्गावर तोरसोळे फाटा येथे धोकादायक वळणावर नांदगावहुन देवगडच्या दिशेने वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली या अपघातात कारचालक महेश तोरसकर व त्यांची आई मनीषा तोरसकर या मायलेकाचा जागीचं मृत्यू झाला.अपघात वृत्त समजतात वळीवंडे, तोरसोळे, शिरगाव ,तळेबाजार परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत कारमधील अपघातात मृत्यू झालेल्या तसेच जखमी झालेल्या बाहेर काढले जखमींना शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी देण्यात आले. अपघाताची माहिती घटना समजताच देवगड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भालेराव, सुधीर कदम, पोलीस उपनिरीक्षक आगा ,पोलीस हे. अर्जुन जाधव, निलेश पाटील, विशाल वैजय, दीपेश तांबे, संतोष नाटेकर,यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अपघातात गुरुनाथ श्रीराम पारकर व त्यांची पत्नी श्रध्दा उर्फ नीता पारकर या गंभीर जखमी झाले असून त्यांना दोघांनाही उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शिरगाव येथे हलविण्यात आले होते. तिथून पुढे नीता यांना गोवा तर गुरुनाथ यांना कणकवली येथील हलविण्यात आले. अपघातात मृत्युमुखी पडलेले तळेबाजार येथील व्यापारी महेश तोरसकर त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुलगे असा परिवार आहे. त्यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी समजतात तळेबाजार बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

आणि तासाभरातंच अपघात ग्रस्त ट्रक अचानक पेटला. कणकवली येथील नगरपंचायत अग्निशामन बंब आल्यानंतर आग आटोक्यात आली. अपघात ग्रस्त हा झारखंड येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.मात्र या 10 चाकीचिरे वाहतुकीसाठी येणाऱ्या गाड्या व त्यातून होणारी ओव्हरलोड वाहतूक यावर आरटीओने काहीतरी निर्बंध घावावेत अशी मागणी होत आहे.







