केंद्रपारा : ओडिशाच्या केंद्रपारा जिल्ह्यातील गावकरी रातोरात लखपती झाले आहेत. ओडिशातील केंद्रपारा जिल्ह्यातील एका गावात सुमारे 40 लोकांच्या खात्यात अचानक मोठी रक्कम जमा झाली. अज्ञात व्यक्तीकडून पैसे आल्यानंतर पैसे काढण्यासाठी केंद्रपारा येथील बँकेत गर्दी झाली.
यावेळी काही लोकांनी बँकेतून पैसे काढून घेतले, मात्र गर्दी वाढल्याने अधिकाऱ्यांना संशय आला. यानंतर अधिकाऱ्यांनी बँकेतून पैसे काढून घेण्यास थांबवण्यात आले. सुमारे 40 बँक खात्यांमध्ये अचानक मोठी रक्कम जमा झाली. खातेदारांच्या मोबाईलवर हा मेसेज पोहोचताच त्यांना आनंद तर झालाच पण ही रक्कम कुठून आली याबाबत संभ्रम निर्माण झाला. यानंतर बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण केंद्रपारा जिल्ह्यातील औल ब्लॉकमधील ओडिशा ग्राम्य बँकेच्या बटीपाडा शाखेशी संबंधित आहे. आपल्या खात्यात मोठी रक्कम जमा झाल्याचे खातेदारांना समजताच त्यांनी ती काढण्यासाठी तातडीने बँक गाठली. यावेळी काही लोकांनी खात्यातून पैसे काढले. अनेक लोक रिकाम्या हाताने गेले.
संशयास्पद वाटल्याने बँक अधिकाऱ्यांनी तात्पुरते पैसे काढणे थांबवले
खातेदारांच्या मोबाईलवर त्यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आला होता. यामध्ये अनेक हजारांपासून ते दोन लाखांपर्यंतची रक्कम जमा झाल्याची माहिती देण्यात आली.
यानंतर लोकांनी तात्काळ पैसे काढण्यासाठी बँक गाठली. बँकेत लोकांची गर्दी झाली होती. बँकेच्या अधिकाऱ्यांना लोकांची गर्दी पाहून खात्यात येणारी रक्कम संशयास्पद असल्याचे लक्षात येताच त्यांनी पैसे काढण्यास तात्पुरती बंदी घातली.





