राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत मळगाव इंग्लिश स्कूल अव्वल..!

150

सावंतवाडी : प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपुर राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२३ /२४ यामध्ये मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव या शाळेतील विद्यार्थ्याचा तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आला.

या स्पर्धेसाठी प्रशालेतील हर्षिता राऊळ, नेहा राऊळ, आदिती राणे, रुणाल पेडणेकर, किशोर फडके, सोहम ठाकूर, बापू जोशी, दुर्वांकुर राऊळ, आशीर्वाद रेडकर, मधुकर धुरी यांनी सहभाग घेतला होता. या सर्व नाटकासाठी प्रशालेतील संगणक निदेशक रितेश सत्यवान राऊळ यांनी खूप मेहनत घेतली. या सर्व नाटकाचे लेखन, नेपथ्य तसेच दिग्दर्शक हे सर्व कामे रितेश राऊळ यांनी केले. तसेच विद्यार्थ्यांचे नाटक बसविण्याची सर्व मेहनत यांनी घेतली. यात प्रशालेतील ग्रंथपाल  सतीश राऊळ यांनी ही मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय संस्थेचे अध्यक्ष शिवराम मळगावकर, सचिव राजाराम राऊळ, खजिनदार नंदकिशोर राऊळ तसेच शाळा कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, कायदेविषयक सल्लागर अँड. विरेश राऊळ, शिक्षण सल्लागार वैजनाथ देवण, शाळेचे मुख्याध्यापक मारुती फाले, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सर्वांचे विशेष अभिनंदन केले.