देवगड : श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर व कुणकेश्वर ग्रामस्थ ,तसेच रोटरी क्लब कणकवली देवगड यांच्यावतीने श्रावण सोमवारच्या निमित्ताने महाआरोग्य शिबिराचे चांगल्या पद्धतीने आयोजन व नियोजन कुणकेश्वर मध्ये केले. याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करत. याही पुढे अशीच वैद्यकीय शिबिरे कुणकेश्वर मध्ये घेतली जावी असे प्रतिपादन महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मुंबईचे राजाराम सावंत यांनी कुणकेश्वर मध्ये केले. कुणकेश्वर भक्तनिवास येथे आयोजित महाआरोग्य शिबिर व औषध वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते व्यासपीठावर बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर देवगड रोटरी क्लबचे प्रवीण पोकळे, कणकवली रोटरी क्लबचे डॉ विद्याधर तायशेटे, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे, उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, खजिनदार अभय सरपंच शशिकांत लब्दे,डॉ आर एस कुलकर्णी, तालुका वैद्यकीय अधिकारी उमेश पाटील, डॉ सुनील आठवले, कुडाळ रोटरी क्लबचे प्रणव तेली, डॉ राजेश नवांगुळ,डॉ धनंजय रासम, डॉ संदीप सावंत,डॉ अनंत नागवेकर,आदी उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित डॉक्टरांचा श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी, मधुमेह, हिमोग्लोबिन, ईसीजी, कान, नाक, घसा, डोळे, संधीवात,त्वचाविकार, पोटविकार महिलांच्या व मुलांच्या आजाराची तपासणी, हृदयविकार, व दमा या सर्व आजारांची मोफत तपासणी करून मोफत औषध वाटप करण्याची सुविधाही या शिबिरात उपलब्ध केली होती. या शिबिराच्या माध्यमातून ज्या रुग्णांची नेत्र तपासणी झाली आहे.नेत्र तपासणी ज्या पेशंटना मोतीबिंदूचा त्रास आहे अशा 25 पेशंटची डोळ्यांची ऑपरेशन तसेच हर्नियाचा आजार असल्यास ती ऑपरेशन सुद्धा कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट रोटरी क्लब देवगड कणकवली यांच्या माध्यमातून केली जाणार असल्याचेही यावेळी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे यांनी सांगितले. या महाआरोग्य शिबिरात कुणकेश्वर दशक्रोशीतील सुमारे 500 पेक्षा जास्त लोकांनी आपली तपासणी करून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवस्थान ट्रस्ट व्यवस्थापक रामदास तेजम यांनी तर उपस्थितांचे आभार रोटरी क्लबचे संजय धुरी यांनी व्यक्त केले.






