देवगड : दक्षिण कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरामध्ये श्रावण महिन्याचे औचित्य साधून शिवसेना उबाठा गटाचे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी श्री देव कुणकेश्वर चरणी अभिषेक करून श्री देव कुणकेश्वराची विधिवत पूजा केली.
यावेळी श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे यांच्याहस्ते आमदार वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष दिनेश धुवाळी संजय आचरेकर आदी पदाधिकारी, तसेच देवस्थान ट्रस्ट व्यवस्थापक रामदास तेजम आदी उपस्थित होते.






