वेंगुर्ला : वेंगुर्ला मराठा समाज बांधवांकडून जालना येथील आंदोलनकर्त्यावर केलेल्या लाठी हल्ला प्रकारचा निषेध करत पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले. महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून गेली अनेक वर्ष महाराष्ट्रातील मराठा समाज विविध आंदोलनाच्या माध्यमातून आपली मागणी शासनाकडे मांडत आहे.
यापूर्वी मराठा क्रांती यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र भर अनेक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तरीही मराठा आरक्षणाबाबत शासनाकडून कोणताही ठाम भूमिका निर्णय झालेला नसल्याने समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होत आहे. अजूनही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक ठिकाणी आंदोलन चालू असतात.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये गेले अनेक दिवस शांततेमध्ये आंदोलन सुरू होते. सदर आंदोलक शुक्रवार दिनांक सप्टेंबर २०२३ रोजी पोलीस यंत्रणेला करण्यात आला. यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. या घटनेचा आम्ही वेंगुर्ला तालुक्यातील समस्त मराठा बांधव निषेध करत असून शांततेने सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक व मिळालेल्या प्रकरणाची शासनाने वरिष्ठ स्तरावर चौकशी करावी व दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत आहोत. तसेच या प्रकरणातून विरोधी पक्षातील विरोध व राजकारण करण्याचा कुटील प्रयत्न करीत असून जाणीवपूर्वक मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्री यांचा बदनामी करण्याचा हेतु पुरस्कर प्रयत्न करीत आहेत अशा व्यक्तीची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी वेंगुर्ला मराठा समाज बांधवांनी वेंगुर्ला पोलीस निरीक्षकाना निवेदन देऊन केली आहे.





