मालवण : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रसाद सुधाकर चव्हाण ( रा. कुंभारमाठ, गोवेकरवाडी, ता.मालवण) याच्याविरुद्ध मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याप्रकरणी आरोपी याला ओरोस येथील जिल्हा न्यायालय येथे हजर केले असता येथील न्यायालयाने आरोपी याची रक्कम रु.१५,०००/- च्या जामिनावर मोकळीक करण्याचा आदेश पारीत केलेला आहे. याकामी ॲड. अनिल निरवडेकर व ॲड. गणेश चव्हाण यांनी काम पाहिले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादीने दिलेल्या तक्रारी नुसार आरोपी व फिर्यादी हिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली त्यामधुन आरोपी याने फिर्यादी हिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखविले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानुसार मालवण पोलीस ठाणे येथे आरोपी याच्या विरुद्ध भा.द.वि. कलम ३७६(१),३७६(२)(एन),३७६(३)सह POCSO ॲक्ट २०१२ चे कलम ४,८,१२प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानुसार आरोपी याला ओरोस येथील प्रधान जिल्हा न्यायाधीश साहेब यांचे समोर हजर केले असता,याकामी येथील न्यायालयाने आरोपी याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलेली होती, त्यानुसार आरोपी याच्यातर्फे ॲड. निरवडेकर यांनी जामिन अर्ज दाखल केलेला होता, त्यानुसार ओरोस येथील प्रधान जिल्हा न्यायाधीश साहेब श्री.एस.जे.भारुखा यांनी ॲड. निरवडेकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी याची जाचक अटी घालून रक्कम रु. १५,०००/- च्या जामिनावर मोकळीक करण्याचा आदेश केलेला आहे. याकामी आरोपी तर्फे ॲड. अनिल निरवडेकर व ॲड. गणेश चव्हाण यांनी काम पाहिले.





