Home ब्रेकिंग न्यूज दोन मूठ माती कलशांमध्ये एकत्र ! ; सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयात ‘मेरी...

दोन मूठ माती कलशांमध्ये एकत्र ! ; सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ महोत्सवाची सांगता.

108

सावंतवाडी : सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ महोत्सवाची सांगता करण्यात आली.
देशभरात अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात संपन्न होत असून त्यानिमित्ताने अनेक उपक्रम साजरे करण्यात आले. ह्याच अमृत महोत्सवातील उपक्रम म्हणून सावंतवाडी तालुक्यातील सर्व गावांमधील ‘दोन मूठ माती’ कलशांमध्ये एकत्रित करून ती सावंतवाडी पंचायत समिती येथील तालुका कलशात जमा करण्याचा कार्यक्रम आज सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयात आयोजित करण्यात आला.

यानिमित्ताने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच, सदस्य व कर्मचारी यांनी गावातील एकत्रित केलेली कलशातील माती आज सावंतवाडी पंचायत समिती येथील तालुका कलशात जमा केली. सावंतवाडी पंचायत समितीत कलशात जमा केलेली सर्व गावातील माती ही जिल्हास्तरावर पाठवण्यात येणार आहे. तिथून हे कलश राज्यस्तरावर आणि तिथून मग केंद्रस्तरावर असा पाठवण्यात येणार आहे. या कार्यक्रमा दरम्यान सावंतवाडीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हा अमृत महोत्सवी वर्षातील उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व ग्रामपंचायतने राबवल्याबद्दल सर्वांचे विशेष कौतुक केले.