सावंतवाडी : तालुक्यातील दांडेली ग्रामपंचायत बहुउद्देशीय सभागृह विस्तारीकरण करणे या कामासाठी 25- 15 योजना सन 2023 -24 अंतर्गत राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या शिफारशीमुळे ८ लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे.
सदर मंजूर कामाचे पत्र सरपंच निलेश आरोलकर यांच्याकडे, ग्रामपंचायत सदस्य सौ.
उमा पांगम, माजी सरपंच तथा शिवसेना गटप्रमुख संजय पांगम, शाखाप्रमुख तानाजी खोत, विजय नाईक यांनी सुपूर्द केले.
सदर काम होण्यासाठी संजय पांगम, उमा पांगम, तानाजी खोत, बाळा मोरजकर यांनी पाठपुरावा केला.
तसेच काम मंजूर होण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे स्वीय सहाय्यक गजानन नाटेकर, विभाग प्रमुख बाळा शिरसाट यांनी विशेष सहकार्य केले.
दांडेली ग्रामपंचायत इमारत ही मंत्री दीपक केसरकर यांच्या सहकार्यातूनच उभी राहिलेली आहे. तसेच त्यांच्या सहकार्याने ती पूर्णत्वास येत आहे, याबाबत उपस्थितांकडून सर्व ग्रामस्थांच्या वतीने मंत्री केसरकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले.



