BIG BREAKING – देवगडमध्ये उबाठा सेनेला जबरदस्त हादरा.! ; नगराध्यक्षा साक्षी प्रभू, नगरसेवक रोहन खेडेकर यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश.

244

सिंधुदुर्ग : उबाठा सेनेला तळकोकणातून आज चांगलाच दणका बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड – जामसंडे नगरपंचायतच्या विद्यमान नगराध्यक्षा साक्षी प्रभू व नगरसेवक रोहन खेडेकर यांनी आज शिंदे शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहावर जाहीर प्रवेश केला.


यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर,आमदार रवींद्र फाटक, रत्नागिरी, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्गचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, संदेश पटेल, अमोल लोके आदी उपस्थित होते.