डॉ भा. वा. आठवले यांचा ‘रंग माझा वेगळा’ अकरावा कथासंग्रह प्रकाशित.!

56

देवगड :  डॉ. भा. वा. आठवले यांचा ‘रंग माझा वेगळा’ हा अकरावा कथासंग्रह इंद्रनील प्रकाशन कोल्हापूर यांनी नुकताच प्रकाशित केला. या कथासंग्रहासाठी 11 निवडक कथा निवडल्या आहेत. सुप्रसिद्ध साहित्यिक कैलासवासी बापूसाहेब माटे आणि केसरीचे माजी संपादक ग. वि. केतकर यांनी डॉ. भा. वा. आठवले यांना लेखनासाठी सत्तर वर्षांपूर्वी प्रेरणा दिली होती. आणि म्हणूनच हा कथासंग्रह त्यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला आहे.

डॉ. आठवले यांच्या आजवर पाच कादंबऱ्या, अकरा, कथासंग्रह शिवाय आरोग्य, इतिहास, पर्यटन, शिक्षण, कोर्ट खटले इत्यादी विविध विषयांवर अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला आहे.