‘त्या’ युवकाला जामीन तर पत्नीला नोटीस देऊन सोडले ; आरोस येथील दुचाकी चोरी प्रकरण.

192

सावंतवाडी : तालुक्यातील आरोस येथे आज पहाटे घडलेल्या दुचाकी चोरी प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या हुसेन राजासाब मुजावर (वय २९) याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता १५ हजाराच्या जामीनावर मुक्तता करण्यात आली. याकामी अॅड. परिमल नाईक व सुशील राजगे यांनी काम पाहिले. तर दुसरी संशयित मुजावर याची पत्नी वेदिका राजेंद्र देसाई हिला नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.