लाट आली धावून, गाड्यांसह लोकंही गेली वाहून ; व्हिडीओ व्हायरल!

356

मालदीव : समुद्राच्या पाण्याच्या लाटेमध्ये रस्त्यावरील वाहने वाहून गेल्याची घटना घडली आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले असून गाड्यांचेही नुकसान झाले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून मालदीव येथील ही घटना असल्याची माहिती आहे.

अधिक माहितीनुसार, मालदीवमधील माले सिटीला हुलहुमालेला जोडणाऱ्या सिनामले पुलावर ही घटना घडली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये समुद्राच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर अनेक वाहनांची वर्दळ दिसत आहे. तर चौकामध्ये काही वाहने दुसऱ्या एका रस्त्याने जात आहेत. त्यानंतर एक जोराची लाट येते आणि त्यामध्ये वाहने वाहून जातात. दरम्यान, या दुर्घटनेमध्ये काही लोकंही रस्त्यावर पडलेले दिसत आहेत. त्यामुळे समुद्रकिनारी असलेल्या रस्त्यांवरून जाताना नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे असे आवाहन करण्यात आले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.