वैभववाडी : वैभववाडी तालुक्यातील सोनाळी गावात एक धकादायक घटना घडली आहे. सोनाळी वाणीवाडी येथील ६५ वर्षीय महिलेची निर्घुन हत्या करण्यात आली आहे. जयश्री साटम असे या महिलेच नाव असून तिच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून तिची हत्या झाल्याचे समजते. मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडून आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अधिक तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहिती नुसार जयश्री साटम ही एकटी घरात राहायची तिच्यावर घातपात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोनाळी सरपंच भीमराव भोसले हे काही कामानिमित्त साटम यांच्या घरी गेले असता त्यांना जयश्री साटम यांचा मृतदेह दिसून आला. त्यांनी ताबडतोब शेजार्यांना याची कल्पना देत पोलिसांना खबर केली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांना काही संशयास्पद आढल्याने त्यांनी श्वान पथकाला बोलावून शोध सुरू केला आहे.





