अर्चना घारे यांनी घेतली सावंतवाडी विधानसभा बुथ अध्यक्षांची बैठक…!

80

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बुथ अध्यक्ष यांची बैठक माजी मंत्री प्रवीण भोसले व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभागीय अध्यक्षा सौ अर्चना घारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली. सावंतवाडी व वेंगुर्ला तालुक्यातील बहुसंख्य बुथ अध्यक्ष यावेळी उपस्थित होते. या बैठकीमध्ये बुथ कमिटीची रचना, सोशल मीडियाचा प्रभावी वापर व आपत्कालीन परिस्थितीमध्ये बुथ कमिटीने करावयाचे काम याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली.

यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले की,”कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. पार्टीचा बुथ कमिटी अध्यक्ष हा नागरिक व पक्ष यांमधील समन्वय साधनारा दुवा असतो. पार्टीच्या संघटनात्मक रचनेमध्ये बुथ कमिटीला विशेष महत्त्व आहे. बुथ कमिटीची रचना, बूथ कमिटीचे काम, यावरच यापुढील काळातील सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील पक्षाची वाटचाल असणार आहे.