धक्कादायक! दोन दिवसाच्या नवजात बाळाला रिक्षात सोडलं अन् अपहरणाचा केला बनाव.

132

मुंबई : मुंबईच्या जुहू गल्ली परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जुहू गल्ली परिसरात राहणाऱ्या एका दांपत्याने आपल्या अवघ्या 2 दिवसाच्या नवजात अर्भकाचे रिक्षातून अपहरण झाल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दिली. मात्र जुहू पोलिसांनी अवघ्या काही तासातच तपास करून जे सत्य समोर आणलं आहे, हे सत्य ऐकूनच विश्वास नाही व त्या निर्दयी पालकांविषयी डोक्यात संतापाची लाट नक्कीच उसळेल.

मिळालेल्या माहितीनुसार, २ ऑगस्टच्या मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास जुहू गल्ली परिसरात राहणाऱ्या दांपत्याने आपल्या दोन दिवसाच्या बालकाचे रिक्षातून अपहरण झाल्याची तक्रार जुहू पोलीस ठाण्यात दिली.

जुहू पोलिसांनी तपासास सुरुवात केली. तक्रार दिलेल्या दांपत्याच्या शेजाऱ्यांकडे देखील पोलीसांनी चौकशी केली. यात शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेची प्रसूती 29 रोजी राहत्या घरी झाली. तिला एक मुलगा झाला. त्या दिवसानंतर नवजात बालक दिसून आलं नाही म्हणून शेजाऱ्यांनी त्यांच्याकडे चौकशी देखील केली होती.