दोडामार्गच्या पूर परिस्थितीचा मंत्री केसरकर यांच्याकडून आढावा!

दोडामार्ग : राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी सायंकाळी तिलारी धरणाला भेट दिली. धरणातील वाढता पाणी विसर्ग तसेच तिलारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना कुठल्याही प्रकारची हानी पोहचवू नये, याची आवश्यक ती काळजी घेऊन आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी सूचना जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांच्यासह उपस्थित अधिकारी यांना दिल्या. तसेच आवश्यक माहिती जाणून घेतली. दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणातील पाणी विसर्ग सुरू झाला आहे त्यामुळे या भागातील परस्थिती जाणून घेण्यासाठी सावंतवाडी विधानसभा आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी रविवारी सायंकाळी तिलारी येथील धरणातील पाणी विसर्ग येथील धरणाला तसेच मुख्य धरणाच्या ठिकाणी भेट दिली.