रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडच्या माध्यमातून गरजुना देवगड तालुक्यात ३ व्हीलचेअर प्रदान

देवगड : रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडच्या माध्यमातून गरजुना ३ व्हीलचेअर प्रदान करण्यात आले. यात विशेष म्हणजे गरजू व्यक्तीच्या दुर्गमवाडीत वस्तीत जाऊन त्यांना हे व्हीलचेअर प्रदान करण्यात आले. रोटरीच्या माध्यमातून पडेल येथील सत्यवती धाकला चव्हाण, शिरगाव येथील शकुंतला गोविंद गावकर,दहिबाब येथील मंदा गोविंद पोसंम यांना व्हीलचेअर देण्यात आल्या. व्हीलचेअर दिल्याबद्दल लाभार्थीच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी पडेल ग्रामपंचायत सरपंच भूषण पोकळे,रोटरी क्लबचे प्रेसिडेंट प्रविण पोकळे,सेक्रेटरी विजय बांदिवडेकर, चार्टर प्रेसिडेंट हनीफ मेमन श्रीपाद पारकर,संजय धुरी,नरेश डामरी,दयानंद पाटील ,सौ मनस्वी घारे,तसेच पडेल गावचे ग्रामस्थ उपस्थित होते .