”RDX घेऊन एक टँकर गोव्याकडे निघालाय.!” | मुंबई पोलिसांना धमकीचा फोन ; यंत्रण अलर्ट मोडवर

मुंबईः मुंबई पोलिसांना एक धमकीचा फोन आला असून आरडीएक्स घेऊन एक टँकर गोव्याच्या दिशेने निघाल्याचं त्यात सांगण्यात आलं. शिवाय टँकरसोबत दोन पाकिस्तानी दहशतवादी असल्याचीही माहिती फोनव्दारे देण्यात आली. या फोन कॉलनंतर यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली असून गोव्याच्या दिशेने निघालेल्या वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती महाराष्ट्र एटीएस आणि क्राईम ब्रँचलाही दिलीय. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपलं नाव पांडे असल्याचं सांगितलं जात आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने टँकरसोबत दोन पाकिस्तानी दहशतवादी असल्याचं सांगितल्याने खळबळ उडाली आहे. गोवा पोलिसही अलर्ट मोडवर आलेले आहेत. यापूर्वीदेखील पोलिसांना असे कॉल्स आलेले आहेत.