BIG NEWS – बेपत्ता लोकांना मृत घोषित करणार.! | इर्शाळवाडीतील सर्च ऑपरेशन थांबवलं.

रायगडः बुधवारी रात्री रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी येथे दरड कोसळून अनेक घरं मलब्याखाली गेली होती. सर्च ऑपरेशन आजपासून थांबवण्यात आल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. खालापूर पोलिस ठाण्यात सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. इर्शाळवाडीत आतापर्यंत २७ मृतदेह सापडले आहेत. परंतु ५७ जण बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करून आजपासून एनडीआरएफचे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले आहे. दरम्यान, बचावलेल्या १४४ लोकांचे लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल, असे पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.